पोस्ट्स

ऑक्टोबर २३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक motivational कविता :

 एक motivational कविता : Busy Busy काय करता वेळ काढा थोडा आयुष्यभर चालूच असतो  संसाराचा गाडा खूप काम, रजा नाही  मिटिंग, टार्गेट,फाईल  अरे वेड्या यातच तुझं  आयुष्य संपून जाईल नम्रपणे म्हण साहेबांना  दोन दिस रजेवर जातो  फॉरेन टूर राहिला निदान  जवळ फिरून येतो  आज पर्यंत ऑफिससाठी किती किती राबलास खरं सांग कधी तरी तू मनाप्रमाणे जगलास ? मस्त पैकी पाऊस झालाय  धबधबे झालेत सुरू  हिरव्यागार जंगला मध्ये दोस्ता सोबत फिरू  बायकोलाही म्हण थोडं  चल येऊ फिरून  पुन्हा होऊ तरुण पंजाबी घाल, प्लाझो घाल लाऊ द्या लाल लिपस्टिक  बायकोला शब्द द्यावा करणार नाही किटकीट पोळ्या झाल्या की भाकरी  अन भाकरी झाली की भाजी स्वयंपाक करता करताच बायको होईल आजी गुडघे लागतील दुखायला तडकून जातील वाट्या  दोघांच्याही हातात येतील म्हातारपणाच्या काठ्या  जोरजोरात बोलावं लागेल  होशील ठार बहिरा मसणात गवऱ्या गेल्यावर आणतो का तिला गजरा ? तोंडात कवळी बसवल्यावर कणीस खाता येईल का ? चालतांना दम लागल्यावर डोंगर चढता येईल का ? अरे बाबा जागा हो टाक द...

विनाअनुदानित शिक्षकांचे भावी नेतृत्व शुभांगी ताई पाटील आ. विक्रम काळे विक्रम काळे

 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *महाराष्ट्र टीचर्स*               *असोसिएशन* ➖➖➖➖➖➖➖      काल दि 22/10/2021 रोजी औरंगाबाद विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार  *मा विक्रम काळे साहेब उपाख्य सर्वांचे बप्पा*  हे नंदुरबार येथे पी आर सी निमित्ताने आले असता धुळ्यात महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.     आमदार काळे साहेबांच्या स्वागता निमित्त धुळे येथील हिंदी राष्ट्र भाषा सभा हॉल येथे स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यातआला होता ,यावेळी मंचावर आमदार विक्रम काळे साहेब यांच्या सोबत महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील , धुळे जिल्हा वकील संघाचे सचिव ऍड विवेक सूर्यवंशी,मुफटा संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष हबीब सर, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे कदमसर,व संस्थाचालक मधुकरराव गांगुर्डे सर, युवा मल्हार सेनेचे प्रदेश अध्यक्ष अण्णा खेमणार , टी डी एफ चे बाविस्कर सर, संस्थाचालक, अहिरे सर , सरपंच प्रदीप चव्हाण सर स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष स्वामी कुटे आदी विराजमान होते.       या...