पोस्ट्स

जुलै २३, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण

इमेज
  वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करताना आपण गैरमार्गांचा अवलंब कराल तर सावधान . वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करताना आपण गैरमार्गांचा अवलंब कराल तर सावधान ! नमस्कार! सध्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत ज्या शिक्षकांची बारा वर्षे सेवा झालेली आहे. अशा शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व ज्या शिक्षकांची सेवा 24 वर्षे झालेले आहे त्या शिक्षकांसाठी निवड श्रेणी प्रशिक्षण सुरू आहेत. हे प्रशिक्षण साधारणपणे 45 दिवसांमध्ये शिक्षकांना ऑनलाइन पूर्ण करावयाचे आहे. परंतु हे प्रशिक्षण पूर्ण करत असताना अनेक प्रशिक्षणार्थी गैरमार्गाचा अवलंब करत आहेत. अशा तक्रारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडे गेल्या आहेत. आपण हे प्रशिक्षण घेत असाल आणि जर ते पूर्ण करण्यासाठी कोणत्या गैरमार्गाचा अवलंब करत असाल तर आपल्यासाठी ही एक धोक्याची घंटा आहे. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 प्रशिक्षण पूर्ण करताना आढळलेले गैरमार्ग Mistakes found while completing the training / Malpractices in senior and junior grade training १. आपले प्रशिक्षण दुस...

पुस्तकात वहीचे पाने का?

इमेज
  पुस्तकात वहीचे पाने का? शालेय पाठ्यपुस्तकात वहीची पाने देण्याचे कारण काही? शालेय वर्ष २०२३ २४ साठी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय नुसार पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांच्या पृष्ठांचा समावेश केलेला आहे. ही पृष्ठे 'माझी नोंद' या शीर्षकाखाली देण्यात आली आहेत. ही सर्व पाठ्यपुस्तके इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकात्मिक पद्धतीने चार भागांत पथदर्शी स्वरूपात प्रकाशित करण्यात आलेली आहेत. या पाठ्यपुस्तकांतील पृष्ठांचा प्रभावी व सुयोग्य वापर होण्याच्या हेतूने शिक्षकांसाठी हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. परिपत्रक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, 'बालभारती', सेनापती बापट मार्ग, पुणे ४११००४.(दूरध्वनी क्रमांक : ०२०-२५६५९४६५ फॅक्स क्रमांक : ०२०-२५६५६०४६ ) विषय : पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पृष्ठांच्या प्रभावी वापराबाबतची सर्वसाधारण मार्गदर्शन सूचना.. शालेय वर्ष २०२३ २४ साठी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र. २१६/एसडी-४, दिनांक ८ मार्च २०२३ नुसार पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांच्या पृष्ठांचा समाव...