शेतकऱ्यांचं व्यथा: एक संघर्षमय वास्तव

शेतकऱ्यांचं व्यथा: एक संघर्षमय वास्तव आपला भारत देश हा कृषिप्रधान आहे. देशातील सुमारे ८० टक्के लोकसंख्या शेतीशी निगडीत आहे. शेतकऱ्यांचं जीवन कठीण आहे, कारण त्याच्या कष्टाला हवं तेवढं मोल मिळत नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, कधी वादळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतं. त्यामुळेच अनेक शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. शेतीचं महत्त्व आणि सन्मान शेती म्हणजे केवळ अन्नधान्य उत्पादन नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीचं आधारस्तंभ आहे. ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ ही उक्ती खोटी नाही. आज आपण ‘डॉक्टर’, ‘इंजिनिअर’ होण्याची स्वप्न बघतो, पण ‘शेतकरी’ होण्याची इच्छा फारच कमी लोकांमध्ये दिसते. समाजात शेतकऱ्यांना दुय्यम स्थान दिलं जातं हे अत्यंत दुःखद आहे. शेतीमधील अडचणी आणि व्यापाऱ्यांची लुबाडणूक शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारात योग्य दर मिळत नाही. व्यापारी आणि दलाल हे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरतात. सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. परिणामतः शेतकरी कर्जबाजारी होतो, नैराश्यात जातो. सरकारी योजना आणि तंत्रज्ञानाचा वापर सरकारकडू...