महाडीबीटी पोर्टल योजना : - अर्ज एक-योजना अनेक

महाडीबीटी पोर्टल योजना : - अर्ज एक-योजना अनेक महाडीबीटी पोर्टल वर शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास पुनःश्च सुरवात ➡️राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर " शेतकरी योजना " या शीर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . ➡️या सुविधे अंतर्गत लाभार्थीनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. ➡️सन २०२१-२२ करिता अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे . या प्रक्रियेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी सन २०२०-२१ मध्ये महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केला आहे . परंतु त्यांची कोणत्याही योजनेसाठी निवड झाली नाही ते शेतकरी त्यांच्या अर्जातील बाबींमध्ये बदल करू शकतील . असे अर्ज सन २०२१-२२ करिता ग्राह्य धरले जातील , त्याकरिता त्यांच्या कडून पुन्हा शुल्क आकारले जाणार नाही. ➡️सन २०२१-२२ करिता वरील अर्जातील ज्या बाबींकरिता अर्ज केलेला नाही त्या बाबींचा अर्जामध्ये विनाशुल्क समावेश करता येईल. ➡️महा - डीबीटी पोर्टलवर "शेतकरी योजना" या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरित...