पुस्तकात वहीचे पाने का?

पाठ्यपुस्तकात वहीची पाने देण्याचे कारण काही?

 पुस्तकात वहीचे पाने का?



शालेय पाठ्यपुस्तकात वहीची पाने देण्याचे कारण काही?

शालेय वर्ष २०२३ २४ साठी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय नुसार पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांच्या पृष्ठांचा समावेश केलेला आहे. ही पृष्ठे 'माझी नोंद' या शीर्षकाखाली देण्यात आली आहेत. ही सर्व पाठ्यपुस्तके इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकात्मिक पद्धतीने चार भागांत पथदर्शी स्वरूपात प्रकाशित करण्यात आलेली आहेत. या पाठ्यपुस्तकांतील पृष्ठांचा प्रभावी व सुयोग्य वापर होण्याच्या हेतूने शिक्षकांसाठी हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.


परिपत्रक


महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, 'बालभारती', सेनापती बापट मार्ग, पुणे ४११००४.(दूरध्वनी क्रमांक : ०२०-२५६५९४६५ फॅक्स क्रमांक : ०२०-२५६५६०४६ )


विषय : पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पृष्ठांच्या प्रभावी वापराबाबतची सर्वसाधारण मार्गदर्शन सूचना..


शालेय वर्ष २०२३ २४ साठी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र. २१६/एसडी-४, दिनांक ८ मार्च २०२३ नुसार पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांच्या पृष्ठांचा समावेश केलेला आहे. ही पृष्ठे 'माझी नोंद' या शीर्षकाखाली देण्यात आली आहेत. ही सर्व पाठ्यपुस्तके इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकात्मिक पद्धतीने चार भागांत पथदर्शी स्वरूपात प्रकाशित करण्यात आलेली आहेत. या पाठ्यपुस्तकांतील पृष्ठांचा प्रभावी व सुयोग्य वापर होण्याच्या हेतूने शिक्षकांसाठी हे परिपत्रक निर्गमित करत आहोत. खालील सूचनांचे पालन सर्व शिक्षकांनी वर्गकार्यादरम्यान होईल, याकडे कटाक्षाने लक्ष दयावे.


पाठ्यपुस्तकांतील पृष्ठांचा प्रभावी व सुयोग्य वापर


या पानांचा वापर, सर्वसाधारणपणे खालील स्वरूपाच्या नोंदी आवश्यकतेनुसार घेण्यासाठी करता येईल.


१. प्रत्येक विदयार्थ्यांच्या 'माझी नोंद' यामधील नोंदी समान असण्याचा आग्रह धरू नये.


२. विदयार्थ्यांनी तारीखवार नोंदी कराव्यात.


३. वर्गातील चर्चेदरम्यान उपस्थित झालेले मुद्दे लिहून ठेवण्यासाठी


४. महत्त्वाचे मुद्दे नोंदवून घेण्यासाठी


५. वर्गात सूचवलेले अधिकचे प्रश्न नोंदवण्यासाठी


६. काही संदर्भ, वर्तमानपत्रांत विषयांच्या अनुषंगाने आलेली विविध प्रकारची माहिती/साहित्यांची नोंद घेणे.


७. पाठाच्या अनुषंगाने वर्तमानपत्रे, माध्यमे इत्यादींद्वारे प्रकाशित झालेल्या अवांतर माहितीची पाठ्यपुस्तकांबाहेरील माहिती लिहून ठेवण्यासाठी.


८. पाठ्यपुस्तकांबाहेरील परंतु आशयाला पूरक माहितीची नोंद घेणे.


९. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेदरम्यान उपस्थित झालेले प्रश्न लिहिणे.


१०. चित्राकृती, चित्र, आलेख, आकृत्या काढण्यासाठी


११. पाठाला पूरक मुद्दे लिहून ठेवण्यासाठी


१२. कच्चे काम (पेन्सिलने ), सूत्रलेखन, महत्त्वाचे संबोध, गणित सोडवण्याची वेगळी रीत मांडणे, पाढे तयार करणे पडताळणी करणे इत्यादी.


१३. नियम, सूत्रे, घटना, संबंध, घटनाक्रम आकृत्या, ओघतक्ता, संकल्पनाचित्र, मुक्तोत्तरी प्रश्नांची नोंद, तुलनात्मक नोंदी, व्यावहारिक अनुभव विश्वातील उदाहरणे, नावीन्यपूर्ण उपक्रमांची नोंद, स्वनिर्मित उदाहरणांची नोंद


१४. शब्दार्थ, प्रतिशब्द, संकल्पना, पर्यायी शब्द, वाक्प्रचार, जोडशब्द, म्हणी, भाषिक खेळ, भाषिक सौंदर्य असणारी वाक्ये, व्याकरणातील व्याख्या व उदाहरणे, महत्त्वाचे जोडशब्द, विरुद्धार्थी, समानार्थी शब्द, सुविचार, सुभाषित, ब्रीदवाक्ये, भाषिक खेळ, इंग्रजीतील शब्दांचे उच्चारण देवनागरी लिपीमध्ये लिहिणे.


१५. सहसंबंध लावण्यासाठी, महत्त्वाच्या संकल्पना उतरवण्यासाठी, विस्तारित अर्थ नोंदवणे.


१६. रेखाकाम, ठसेकाम, चित्रकाम (इयत्ता पहिली ते पाचवीसाठी) नोंदीसाठी


१७. विषयाच्या अनुषंगाने विदयार्थ्यांना सूचलेल्या स्वतःच्या उदाहरणांच्या


१८. विषय शिकताना इतर विषयाशी आलेल्या सहसंबंधाची नोंद


१९. गृहकार्य लिहून घेण्यासाठी


उपक्रमाचा उद्देश


 उपक्रमाचा उद्देश पुढीलप्रमाणे आहे, हे विचारात घेऊन या पानांचा अत्यंत प्रभावी वापर होईल असे पाहावे :-


१. एकच पाठ्यपुस्तक शाळेत न्यावे लागेल त्यामुळे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल.


२. पाठ्यपुस्तकांचे स्वयंअध्ययन करताना या नोदींचा वापर विदयार्थ्यांना करता येईल.


३. नोंदीचा वापर त्याला स्वयंअध्ययनासाठी करता येईल, त्यामुळे प्रत्याभरण (Input) व दृढीकरण ( Obsession) होईल.


४. विद्यार्थ्यांना स्वतःच्या शब्दांमध्ये स्वतः च्या नोंदी करता येतील व ही सवय त्यांच्या अंगवळणी पडेल.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Pronoun words 👉 What is Pronoun? Definition, Types & Examples in Marathi and English

"🔖 पहिली ते आठवी अकारिक मूल्यमापन चाचणी 2025 | सर्व विषयांचे PDF डाऊनलोड लिंक एकत्र!"