विनाअनुदानित शिक्षकांचे भावी नेतृत्व शुभांगी ताई पाटील आ. विक्रम काळे विक्रम काळे

 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*महाराष्ट्र टीचर्स*

              *असोसिएशन*

➖➖➖➖➖➖➖

     काल दि 22/10/2021 रोजी औरंगाबाद विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार 

*मा विक्रम काळे साहेब उपाख्य सर्वांचे बप्पा* 

हे नंदुरबार येथे पी आर सी निमित्ताने आले असता धुळ्यात महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

    आमदार काळे साहेबांच्या स्वागता निमित्त धुळे येथील हिंदी राष्ट्र भाषा सभा हॉल येथे स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यातआला होता ,यावेळी मंचावर आमदार विक्रम काळे साहेब यांच्या सोबत महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील , धुळे जिल्हा वकील संघाचे सचिव ऍड विवेक सूर्यवंशी,मुफटा संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष हबीब सर, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे कदमसर,व संस्थाचालक मधुकरराव गांगुर्डे सर, युवा मल्हार सेनेचे प्रदेश अध्यक्ष अण्णा खेमणार , टी डी एफ चे बाविस्कर सर, संस्थाचालक, अहिरे सर , सरपंच प्रदीप चव्हाण सर स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष स्वामी कुटे आदी विराजमान होते.

      या वेळी राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी आपल्या स्वागत पर मनोगतात सांगितले की, मा विक्रम काळे साहेब हे सत्ता पक्षाचे वजनदार आमदार आहेत,ते उप मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा यांचे निकटवर्तीय आहेत त्यामुळे त्यांनी राज्यातील पदवीधरांसह शिक्षकांच्या प्रश्नांना न्यायमिळवून द्यावा ज्या मध्ये अपात्र शाळा पात्र करून तसेच अघोषित शाळा,नैसर्गिक तुकड्यांना घोषित करून त्यांना दादांच्या माध्यमातून येत्या अधिवेशनात निधी उपलब्ध करून द्यावा,तसेच जुनी पेन्शन,नवी पेन्शन प्रचलित धोरणानुसार अनुदान लागु करून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली,व सांगितले की शिक्षकांच्या प्रश्नां साठी मा काळे साहेब मोठे भाऊ म्हणून नेहमीच मला साथ देतात या पुढे ही ते भक्कम पणे माझ्या पाठीशी असतीलच अशी अपेक्षाव्यक्त केली.

     सत्काराला उत्तर देताना आ मा विक्रम काळे साहेबांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शुभांगी ताई एक लढवय्य नेतृत्व आहेत शिक्षक-पदवीधरां साठी न्यायमिळवून देताना आम्ही नेहमीच त्यांना लढतांना पाहिले आहे त्यामुळे त्यांच्या रूपाने आम्ही त्यांना भविष्यातील शिक्षक- पदविधारांचे नेतृत्व पहात आहोत.तसेच अपात्र शाळा,अघोषित शाळा व नैसर्गिक तुकड्यां बाबत येत्या अधिवेशनात निश्चित निर्णयघेण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली तसेच प्रचलित अनुदान व जुनी पेन्शन संदर्भात देखिल सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.

      या वेळी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन , महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशन ,जुनी पेन्शन हक्क संघटना, मुफटा संघटना, उर्दू संघटना आदी विविध संघटनाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आमदार विक्रम काळे साहेब यांना निवेदन देण्यात आले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा मल्हार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष शिरीष धनगर सर यांनी केले.

      कार्यक्रमात पटेल सर श्री एस सी पाटील सर, विनाअनुदानित क म वी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र बच्छाव सर,गिरासे सर, धनराळे सर, गुलाब ठोंबरे सर,तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी च्या कार्याध्यक्ष सौ संजीवनी गांगुर्डे मॅडम, मीनाक्षी ताई पाटील,चौधरी मॅडम, सपना पाटील मॅडम, जाधव सर,भामरे सर,अहिरे सर,भारत दादा बेग सर,वाघमारे,ए जी पाटील एन डी पाटील सर,पाटील सर , दिव्य मराठी चे पत्रकार अमोल पाटील व टीम तसेच उर्दू चे प्राचार्य व शिक्षक आदींची प्रमुख उपस्थिती होती

     तर कार्यक्रम यशस्वीते साठी जितेंद्र वाघ सर,साळुंखे सर, भटू फौंजी, वसीम सर, मोहन अहिरे सर,चंद्रकांत पाटील विशाल शिंदे सर व स्टुडंट्स असोसिएशन च्या पदाधिकारी आदींनी विशेष परिश्रम घेतले. 

तर कार्यक्रमासाठी हिंदी राष्ट्रभाषा सभेचे सचिव

 प्रा जसपालसिंह सिसोदिया सर व कुरील मॅडम यांचे अनमोल सहकार्य लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Pronoun words 👉 What is Pronoun? Definition, Types & Examples in Marathi and English

"🔖 पहिली ते आठवी अकारिक मूल्यमापन चाचणी 2025 | सर्व विषयांचे PDF डाऊनलोड लिंक एकत्र!"