महाडीबीटी योजना
महाडीबीटी योजना
महाडीबीटी पोर्टल योजना : - अर्ज एक-योजना अनेक
महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर लॉटरीत अद्याप नाव आलेल्या शेतकऱ्यांना अर्जातील बाबींमध्ये विनाशुल्क बदल करता येणार आहे.तसेच नव्याने अर्ज स्वीकारणे चालू झाली आहे त्यासाठी कोणती अंतिम मुदत ठेवण्यात आलेली नाही.
कृषी खात्याच्या विविध योजनांमधील अनुदानाचा लाभ देण्यासाठी दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करण्याची किचकट पद्धत आता बंद करण्यात आलेली आहे पारदर्शकतेसाठी सर्व सुविधा देणारे https://mahadbtmahait.gov.in हे महाडीबीटी पोर्टल सुरू झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय आता दूर झालेली आहे बहुतेक योजनांसाठी एकाच ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मिळाल्याने बारा लाख शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात 24 लाख बाबीसाठी अर्ज केले आहे या या पोर्टल मुळे बहुतेक शेतकऱ्यांची गैरसोय आता बंद झालेली आहे कोणताही शेतकरी या पोर्टलवर केव्हाही अर्ज करून आपल्याला मिळणारे अनुदान शासनाचे योजना याबद्दल माहिती मिळू शकतो
2020/2021 मध्ये या महाडीबीटी पोर्टल वर योजनांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यानुसार काढलेल्या लॉटरी मध्ये शेतकऱ्यांना काही कितानी पूर्वसंमती चे पत्र देणे सुरु आहे. काही योजनांमध्ये निधीच्या उपलब्धतेनुसार काम सुरू आहे. मात्र कोणतेही योजना साठी निवड झालेल्या शेतकऱ्यांसाठी आता पुन्हा महाडीबीटी पोर्टल वर बाबी निवडण्याची सुविधा देण्यात आलेली आहे असे सुधारित अर्ज 2021/22 करिता ग्राह्य धरणार आहे तसेच आता मदत करणाऱ्या शेतकऱ्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही
अर्ज करण्यासाठी शेतकरी महाराष्ट्रातील कोणत्याही सेवा केंद्राची मदत घेऊ शकतात व कोणतेही तांत्रिक अडचण आल्यास
helpdeskdbtfarmer@gmail.com या मेलवर किंवा 02025511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा आधार क्रमांक आधी महाडीबीटी पोर्टल वर प्रमाणित करून द्यावा लागणार आहे त्यानंतरच महाडीबीटी पोर्टल वर असणाऱ्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे जर एखाद्या शेतकऱ्याकडे आधार कार्ड नसेल तर सर्वप्रथम त्या शेतकऱ्याने आधार नोंदणी क्रमांक केंद्रावर जाऊन अगोदर आधार नोंदणी करून घ्यावी त्यानंतरच महाडीबीटी पोर्टल वर लॉग इन करावे असे सक्त ताकीद करण्यात आलेले आहे आधार कार्ड शिवाय शेतकऱ्यांना कोणतेही योजना चा लाभ घेता येणार नाही..
प्रतिक्रिया
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी
आता महाडीबीटी पोर्टल वर केव्हाही नोंदणी करू शकतात अर्ज केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांची लॉटरी द्वारे निवड करण्यात येईल लॉटरी चालू असताना काही दिवस प्रवेशअर्ज बंदरातील लॉटरी निवड झाल्यानंतर परत प्रवेश अर्ज चालू होणार आहे या बाबीची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी
टिप्पण्या