अनुदान आमच्या हक्कांचं, नाही कुणाच्या बापाचं
*अनुदान आमच्या हक्कांचं, नाही कुणाच्या बापाचं*
मित्रांनो नमस्कार, मी जरी शारीरिक दृष्ट्या प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी नसलो तरी घरी बसून मी माझ कर्तव्य पार पाडत आहे. आपल्या आंदोलनाची बातमी लावण्यात यावी यासाठी एबीपी माझा मुंबई ब्रांचला फोन केला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आणि तुमची बातमी लावण्यासाठी आम्हाला मेल करा. असं स्पष्ट संदेश त्यांनी मला दिला. एखाद्या नेत्याची बातमी लावायची असेल, एखाद्या नटीची बातमी लावायची असेल तर यांना कोण इमिजेटली मेल किंवा मेसेज करता..? एखादा नेता गुहाटीला गेला तर यांना कोणी मेल केलेला असतो किंवा एखाद्या नेत्याच्या घरी एखादा दीपोत्सव असेल किंवा एक अनेक कोणते कार्यक्रम असतील त्यावेळेस यांना मेल करणारा कोण असतो..? हे गोदी मीडिया वाले त्यांचे हाजी हाजी करत त्यांच्या पाठीमागे फिरत असतात. देशाला आकार देणारा भविष्यातील देश घडवणारा शिक्षक गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून आझाद मैदानावरती आंदोलन करत आहे आणि हे मुंबईतील एबीपी माझाच्या ब्रांचला माहिती नाही... की आझाद मैदानावरती शिक्षकांचा आंदोलन सुरू आहे.? आणि मग ही बातमी लावण्यासाठी त्यांना आपण कळवायचं की दादा इथं अशा पद्धतीचा आंदोलन चालू आहे तुम्हाला मेल केला आहे, तो मेल तुम्ही रीड करा, रीड केल्यानंतर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि मग तुम्ही आमची बातमी लावा. ही सगळी मिली भगत आहे मीडिया कोणाच्या हातून चालतोय? आणि कुणाच्या ताब्यात आहे? कोणती बातमी लावायची, नाही लावायची यांना वरून आदेश आलेल्या असतात. त्यामुळे आपलं जे आंदोलन आहे ते इथून पुढे देखील अशाच पद्धतीने आपण एकजुटीने पुढे नेऊयात. विकल्या गेलेल्या मीडियाच्या भरोशावर आपण आंदोलन करणार नाहीत. पुढे कुठल्याही नेत्याला मेल करणं किंवा कुठल्याही न्यूज चॅनलला मेल करावा लागणार तर आपण हे रिकामे उद्योग करणार नाही. डायरेक्ट आपण त्या नेत्याच्या किंवा मंत्र्याच्या घरी याचे दारावरती आन्दोलन करणार आहोत. कारण साधी गोष्ट आहे की एखादा नट असेल एखादी नटी असेल त्यांनीही केलं याचा अफेअर दाखवलं एखाद्या कुणीतरी एक्स व्यक्ती असल्याने त्याचा अफेअर चालू आहे हे सांगण्यासाठी यांना कोण मेल करत असेल? यांच्या तर भरभरून गोड कौतुक केलं जातं त्यावेळेस त्यांना दिसत. आणि गेल्या 15 ते 20 दिवसापासून आझाद मैदानावर आंदोलनात आहे. आणि जो शिक्षक 15 ते 20 वर्षापासून विनावेतन काम करतोय. या शिक्षकांचे दुःख समजून घेण्यासाठी एबीपी माझाकडे वेळ नाहीये,,,? कि न्यूज चैनल वाले हे विकले गेले आहेत? त्यांना कोणती बातमी लावायची कोणती नाही लावायची हे सगळे वरून आदेश आलेले असतात. लोकशाहीचे जे आधारस्तंभ आहेत तो तिसरा आधारस्तंभ मीडिया जर समजा धोक्यात आला असेल किंवा एखाद्या नेतृत्वाच्या आधारे किंवा त्यांनी सांगितलेल्या दृष्टीने किंबहुना त्याच्या हातातील बाहुलं म्हणून वागत असेल... तर आपल्या देशाची वाटचाल ही लोकशाही सोडून हुकूमशाही कडे होत आहे असं म्हणायला हरकत नाही.
-- अंबादास पारधी (नाशिक)
पिडीत-अंशतः अनुदाणीत शिक्षक .
टिप्पण्या